जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्य़ानंतर आता हिमाचलमध्ये देखील मुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपने केली आहे.
शिमला : गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्य़ानंतर आता हिमाचलमध्ये देखील मुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपने केली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. जयराम ठाकूर पुढचे पाच वर्ष राज्याची कमान सांभाळणार आहेत. जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशमधून ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1998 मध्ये पहिल्यांदा ते आमदारा म्हणून निवडून आले होते.
निवडणुक प्रचारादरम्यान पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रेम कुमार धूमल यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली होती पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने मुख्यमंत्री कोणाला करायचं याबाबत भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना हिमाचलमध्ये पाठवण्याचा विचार देखील सुरु होता. पण आता ते केंद्रामध्येच मंत्री म्हणून राहणार आहेत. आज झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यावर याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज्यातील खासदार देखील उपस्थित होते.