पटणा : बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांनी माफी मागीतली आहे. खुर्शीद अहमद यांनी जय श्रीराम म्हणल्यामुळे त्यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत कण्यात आल्याचा फतवा बिहारमधील इमारत-ए-शरिया नावाच्या संघटनेनं काढला होता. तसंच यामुळे अहमद यांचा निकाह देखील तुटला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जय श्रीरामच्या घोषणेने बिहारच्या जनतेचा फायदा होत असेल तर मला जय श्रीराम बोलण्यात काहीच हरकत नसल्याचं खुर्शीद म्हणाले होते. तसंच अश्या फतव्यांना घाबरत नसल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं होतं.