बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ते सारखे म्हणतात की, विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेचा आशिर्वाद नाही मिळाला. ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. बंगळुरुमधील राजराजेश्वरी नगर विधानसभा सीटवर पुन्हा एकदा जनतेने त्यांना आर्शिवाद नाकारला आहे. येथे काँग्रेस उमेदवाराचा 25,400 मतांनी विजय झाला. एचडी कुमारस्वामी हे काँग्रेस - जेडीएस युतीमुळे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर या जागेवर निवडणूक झाली.


तिसऱ्या स्थानी जेडीएस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेडीएससाठी हा निकाल पुन्हा एकदा लाजवणारा ठरला. जेडीएसच्या उमेदवाराला 60,360 मतं मिळाली. काँग्रेसचे एन मुनिरत्ना यांना 1,08,064 मतं मिळाली तर भाजपच्या तुलसीमुनी राजू गौडा यांना 82,572 मतं मिळाली. रामचंद्र निवडणुकीच्या आधी भाजप सोडून जेडीएसमध्ये आले होते.  


एका खोलीत मोठ्या प्रमाणात निवडणूक ओळखपत्र मिळाल्याने येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. 12 मेला कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या. पण राजराजेश्वरी नगरमध्ये 28 मेला निवडणूक झाली.