बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास आता निश्चित झाला आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवल्याप्रमाणे कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. भाजप सध्या 104 जागांवर आघाडीवर असूनही 113 चा बहुमताचा आकडा गाठता न आल्याने आता भाजपला दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावा लागणार आहे. पण त्यातच काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजप पुढचं आव्हान आणखी वाढलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महत्त्वाचं म्हणजे राज्यात सर्वाधिक कमी जागा मिळूनही त्याचं पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. जेडीएस सध्या 38 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांच्या जागा एकत्र केल्यातर जेडीएस आणि काँग्रेस सत्ता स्थापन करु शकतात. काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. काँग्रेसने जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.