JEE Advanced Result 2022 : देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा JEE Advanced चा निकाल आज सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. जेईई-अ‍ॅडव्हान्स (JEE Advanced) निकालातील विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकींगसह कॅटेगरी रँक (All India Ranking)  देखील जाहीर केला जाणार आहे . JEE-Advanced परीक्षा 28 ऑगस्टला देशातील 225 परीक्षा शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. (JEE Advanced Result 2022 announced today) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे तुम्हाला JEE Advanced Result 2022 थेट लिंक मिळेल


असा डाउनलोड करा निकाल 


सर्व प्रथम, JEE Advanced च्या अधिकृत साईटला भेट द्या jeeadv.ac.in.
यानंतर, उमेदवार होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.
नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा
उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.


कट ऑफ काय आहे?


कटऑफ सामान्य श्रेणीसाठी विषयनिहाय 10 टक्के, सरासरी 35 टक्के आणि OBC आणि EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार 9 टक्के आणि सरासरी 31.5 टक्के आहे. तर, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय 5 टक्के आणि सरासरी 17.5 टक्के आहे. मागील वर्षी खुल्या प्रवर्गातील सरासरी कट ऑफ 17.50, विषयनिहाय 5 टक्के, OBC आणि AWS ची सरासरी 15.75 आणि विषयानुसार 4.50 टक्के, SC आणि ST आणि PH श्रेणीची सरासरी कट ऑफ 8.75 आणि विषयानुसार 2.50 टक्के होती. JEE-Advanced Information Bulletin नुसार, विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत समाविष्ट करण्यासाठी विषयवार आणि सरासरी दोन्ही कटऑफ आधीच घोषित करण्यात आले आहेत