नवी दिल्ली : JEE Exam 2022 : जेईई मुख्य परीक्षा जवळपास दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. आयआयटीसह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर ही   सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता परीक्षेचं पहिलं सत्र जून तर दुसरे सत्र जुलैमध्ये होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय चाचणी कक्षाने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. 



21 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेवरून वाद सुरू होता. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा एप्रिल महिन्यानंतर घ्यावी, अशी मागणी केली होती. तसेच या परीक्षेसाठी दोन ऐवजी चार वेळा संधी देण्यात यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. नॅशन टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे.  जेईई मुख्य परीक्षा 2022 ची तारीख आता नव्याने जाहीर करण्यात येणार आहे.