मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. नीटची परीक्षा आधी ३ मे रोजी होणार होती, ती पुढे ढकलून २६ जुलै करण्यात आली आहे. आज पुन्हा नीटची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेतला आहे.  नीट आणि जीईईजी परीक्षा आता १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी NEET आणि JEEची प्रवेश परीक्षा स्थगित करून पुढील तारखा घोषित केल्या आहेत. JEE मेन/ऍडवान्स आणि NEET 2020 परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. JEE Main ची परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या दिवसांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. JEE ऍडवान्स २७ सप्टेंबर रोजी तर NEET 2020 ही १३ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. 



NTA चे प्रमुख विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेषतज्ज्ञांची एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीकडून अहवाल मागवला होता की, या महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात एनइइटी आणि जेईई परीक्षा आयोजित करण्याकरता अनुकूल स्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे. Covid-19 चा प्रकोप पाहता परीक्षांना सुरक्षित पद्धतीने आयोजित करता येणार आहे.