मुंबई : आज मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यावर जेट एअरवेजचं विमानानं पुन्हा विमानतळावर एमर्जन्सी लॅन्डींग केलं. केबिन क्रूने बेजबाबदारपणे 'ब्लिड स्विच' सुरू न केल्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. विमानात हवेचा योग्य दाब राखण्यात अपयश आल्यामुळे ऑक्सिजन मास्क बाहेर आले. मुंबईहून पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांनी या विमानानं जयपूरला जाण्यासाठी उड्डाण घेतलं होतं. सिल्वासापर्यंत गेलेलं विमान या प्रकारामुळे पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं. विमानात १६६ प्रवासी होते. त्यातल्या ३० जणांच्या नाकातून रक्त वाहू लागले. काही जणांच्या कानातून रक्त येत होते, तर काही प्रवाशांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. अनेक प्रवाशांच्या नाकातून रक्त, अनेकांना डोकेदुखीचा त्रास झाला. 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाईट 9W-697 चं एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं. केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी असलेल्या 'ब्लिड स्विच'ला सुरू करणं क्रू मेम्बर्स विसरले. या विमानातून 166 प्रवासी उपस्थित होते. त्यातील 30 जणांच्या काना-नाकातून रक्त यायला सुरुवात झाली. त्यानंतर उडालेल्या गोंधळात सिल्वासापर्यंत पोहचलेलं विमान पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं. त्यानंतर या प्रवाशांना मुंबई एअरपोर्ट उपचार उपलब्ध करून देण्यात आले.  


या प्रकरणाची गंभीर दखल घेत विमानाच्या क्रूवर तातडीने कारवाई करत त्यांचं काम थांबवण्यात आलंय. या प्रकरणाची अपघात अन्वेषण विभाग आणि डीजीसीए यांच्याकडून चौकशी सुरू झालीय.