नवी दिल्ली : जेट एअरवेजने नवीन वर्षात मोठीच सूट देत 1,001 रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून दिला आहे.


महासेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जानेवारी,2018 पासून प्रवासासाठी जेट एअरवेजची ही सूट लागू होणार आहे. इकॉनॉमी क्लाससाठी ही सवलत दिली जाणार आहे. जेट एअरवेजने नुकताच ही योजना जाहीर केली आहे. 


1,001 रुपयांत तिकिटं


या सवलतीनुसार देशभरातील 44 ठिकाणांसाठी जेट एअरवेज, इकॉनॉमी वर्गासाठी 10 टक्के तर बिझिनेस क्लाससाठी 15 टक्के सूट देणार आहे. या सवलत योजनेच्या काळात विमान प्रवाशी 1,001 रुपयांत तिकिटं बूक करू शकणार आहेत. हा अकरा दिवसांचा सेल 23 डिसेंबर 2017 ते 2 जानेवारी 2018 या दरम्यानच्या काळासाठी लागू असणार आहे.


नियोजन करून बचत


या योजनेचा लाभ घेत प्रवाशी आपल्या प्रवासाचं नियोजन करून प्रचंड बचत करू शकतील. विमान प्रवाशी वेगवेगळ्या सुंदर पर्यटन स्थळांना भेटी देत चांगले अनुभव गाठीशी बांधू शकतात. आमची ही योजना विमान प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय होईल याबद्दल आम्हाला खात्री आहे, असं मत जेट एअरवेजचे संचालक गौरांग शेट्टी यांनी व्यक्त केलं.