Jet Airways आकाशात झेप घेण्यासाठी पुन्हा सज्ज
जेट एअरवेजला आशेची नवी किरण दिसू लागली आहे.
नवी दिल्ली : जेट एअरवेज (Jet Airways) पुन्हा एकदा आकाशात उड्डान भरू शकतो. जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या कमेटी ऑफ क्रेडिटर्स (CoC)ने जेट एअरवेजच्या ठराव योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता जेट एअरवेजला आशेची नवी किरण दिसू लागली आहे. दिवाळा निघालेल्या या कंपनीची ठराव योजना UKची कंपनी Kalrock Capital आणि उद्योगपती मुरारीलाल जालान यांनी सादर केली आहे. गेल्या वर्षी जेट एअरवेजला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अखेर जेट एअरवेजला बंद करण्याचा निर्णय घेतला.
जेट एअरवेज रिझोल्यूशन प्रोफेशनल (RP)ने बीएसईला दिलेल्या माहितीत सांगितले की, या प्रस्तावावर सर्व प्रथम ई-वोटिंग झाली. त्यानंतर या ठरावास मंजूरी देण्यात आली. ई-वोटिंगच्या माध्यमातून मुरारीलाल जालान आणि फ्लोरिएन फ्रिट्श (Florian Fritsch)यांच्या ठराव योजनाला १७ ऑक्टोबर २०२० मध्ये मान्यता देण्यात आली.
दरम्यान, गेल्या वर्षी देशात आधीच बेरोजगारीचे सावट असताना. 'जेट एअरवेज' कंपनी बंद पडली . त्यामुळे २० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. कंपनीवर जवळपास ६ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. कंपनी बंद झाल्यामुळे १६ हजार पे-रोल कर्मचारी आणि ६ हजार कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी अचानक बेरोजगार झाले.
व्यवस्थापनेच्या गचाळ कारभारामुळे कंपनी बंद झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आले. हजारो बेरोजगार कर्मचाऱ्यांनी जंतर-मंतर वर तिव्र आंदोलन देखील केले. यावेळेस त्यांच्या डोळ्यात आश्रू आणि भविष्याची काळजी दिसत होती.