घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जेट इंधनही महागले
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झालीये. गॅस सिलिंडरच्या किंमतीत १.५० रुपयांची वाढ करण्यात आलीये. तसेच विमान प्रवासही महागलाय. विमान इंधन एटीएमच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झालीये.
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झालीये. गॅस सिलिंडरच्या किंमतीत १.५० रुपयांची वाढ करण्यात आलीये. तसेच विमान प्रवासही महागलाय. विमान इंधन एटीएमच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झालीये.
ऑगस्टपासून जेट इंधनाच्या दरात झालेली ही तिसरी वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेल्या बदलामुळे एटीएफच्या दरात वाढ झालीये.
दिल्लीत आता एटीएफचे जर ३,०२५ रुपयांनी वाढून ५३,०४५ रुपये प्रतीलीटर झालेत. याआधी हे दर ५०,२०० रुपये इतकी झालीये. याआधी एक सप्टेंबरला एटीएफच्या किंमतीत ४ टक्के म्हणजेच १,९१० रुपयांची वाढ झाली होती.