नवी दिल्ली : रस्त्यावर भीक मागणारा भिकारी लाखो रुपये कमाई करु शकतो असा तुम्ही कधी विचार केला आहे का? आश्चर्य वाटतयं ना? पण सध्या एका भिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे आणि ती म्हणजेच त्याच्या कमाईमुळे. पाहूयात काय आहे हा प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधील या भिकाऱ्याची कमाई ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. 


३ ते ४ लाख रुपये कमाई


या भिकाऱ्याचं नाव आहे छोटू बरई. छोटू दिव्यांग आहे मात्र, तो प्रत्येक महिन्याला ३०,००० रुपये भीक मागून कमावतो. म्हणजेच तो एका वर्षाला जवळपास ३ ते ४ लाख रुपये कमावतो.


भिकाऱ्याच्या आहेत ३ पत्नी


इतकचं नाही तर तो वेस्ट्रिज नावाच्या मार्केटिंग कंपनीचा सदस्यही आहे. यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या एक-दोन नाही तर तीन पत्नी आहेत.


पत्नींना देतो समान पगार


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३ बायका कमावत असलेले पैसे जमा करुन त्या छोटूकडे जमा करतात आणि त्यानंतर छोटू सर्वांना समान पगार देतो.


भांड्यांचंही आहे दुकानंही


छोटू चक्रधरपुर रेल्वे स्टेशनवर भीक मागतो. दररोज अनेक ट्रेन्स त्या ठिकाणी येतात. तो कंपन्यांचे पर्सनल केअर प्रोडक्टसही विकतो. त्याने बांदी गावात एक भांड्यांचं दुकानही उघडलं आहे. त्याची एक पत्नी दुकान सांभाळते.


छोटूने सांगितले की, त्याने पैसे कमविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आलं नाही. त्यानंतर मी भीक मागण्यास सुरुवात केली.


यापूर्वी कोट्याधीश भिकारी सापडला होता


काही दिवसांपूर्वी रायबरेली येथे एक करोडपती भिकारी आढळला होता. रायबरेलीतील रालपूरमधील कॉलेज परिसरात १३ डिसेंबर रोजी एक वयोवृद्ध व्यक्ती दाखल झाला. कॉलेजच्या संस्थापकांनी त्याला जेवन दिलं. त्यानंतर त्याचे केस कापले आणि दुसरे कपडेही दिले. या व्यक्तीचे जुने कपडे धुण्यासाठी दिले असता त्यामध्ये त्याचं आधार कार्ड आणि एफडीचे कागदपत्र आढळले.


त्या एफडीची किंमत १ कोटी ७ लाख रुपये होती. त्याच्याकडे असलेल्या आधारकार्डवरुन तो तामिळनाडुतील थिरुवनावली येथील असल्याचं समोर आलं.