Bus Accident:प्रवाशांनी भरलेली भरधाव बस थेट नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, अनेकांना जलसमाधी
Jharkhand Bus Accident: रविवार सकाळची सुरुवात एका अपघाताच्या बातमीने होत आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस अचानक नदीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
Bus Accident:रविवार सकाळची सुरुवात एका अपघाताच्या बातमीने होत आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस अचानक नदीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
बस पडल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.. बचावकार्यानंतर जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनास्थळी सरकार आवश्यक ती कार्यवाही करत आहे. राज्य सरकार जखमींना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे झारखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता यांनी म्हटले आहे.
अपघात कसा झाला?
बसमधील अपघातानंतर अनेक प्रवासी अडकून पडले होते. काही लोक नदीत बुडाले मात्र त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त बस रांचीहून गिरिडीहच्या दिशेने जात होती. बस अचानक गिरिडीह-डुमरी रस्त्यावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. बस रेलिंग तोडून 50 फूट खाली नदीत पडली.
अचानक बसमध्ये आरडाओरडा झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन केला, तर स्थानिक लोक बचावकार्यासाठी पुढे सरसावले. काही प्रवाशांचा नदीत बुडून मृत्यूही झाला आहे. लोकांवर उपचार केले जात आहेत.