Crime News : रागाच्या भरात माणूस कोणत्या थराला जाईल याचा काही अंदाज नाही. रागाच्या भरात असताना ती व्यक्ती मग नातेवाईक मित्र कोणत्याही थराला जाऊ शकते. असाच काहीसा प्रकार झारखंडमध्ये (Jharkhand Crime) घडलाय. झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात एका आजीने तिच्या पाच वर्षाच्या नातवाला विहीरीत फेकून दिलं आहे. या घटनेत चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. पोलिसांनी (Jharkhand Police) याप्रकरणी आरोपी आजीला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात एका पाच वर्षांच्या मुलाच्या सावत्र आजीने विहिरीत फेकून मारुन टाकलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालकांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी महिलेने मुलाचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कटकमसांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उलंग गावात राहणाऱ्या या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजल अन्सारी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. फैजल हा त्याचा नातेवाईक असणाऱ्या मुलासोबतच अंगणवाडीत शिकायला जायचा. मात्र गुरुवारी फैजल घरी परतला नव्हता. त्यानंतर नातेवाईकांनी बरीच शोधाशोध केली. शेवटी पोलिसांना बोलवून तपास सुरु करण्यात आला. गुरुवारी संध्याकाळी फैजलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्याच्या गळ्यात दोन विटा बांधल्या होत्या. तपासादरम्यान पोलिसांना या कृत्यामागे कुटुंबातील एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आला होता. मृत फैजलच्या वडिलांनाही त्याची सावत्र आई सरबरी खातून हिचे वागणे संशयास्पद वाटले. त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सरबरी खातूनचे नाव घेतले.


पोलिसांनी फैजलच्या आजीकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. सरबरी खातूने दावा केला की आपण हा गुन्हा केला कारण मृताचे पालक अनेकदा माझा अपमान करत होता. मला त्यांना धडा शिकवायचा होता. त्यामुळे संधी पाहून सरबरी खातूनने फैजलच्या गळ्यात विटा बांधून त्याला विहीरात फेकून दिलं. विहीरीत बुडाल्यामुळे फैजलचा तिथेच मृत्यू झाला. फैजल घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. तेव्हा त्यांना विहिरीजवळ फैजलची चप्पल सापडली. फैजलचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याच्या गळ्यात दोन विटा बांधल्या होत्या.


दरम्यान, झारखंडमध्ये गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. 2018 ते जून 2023 पर्यंत रांची जिल्ह्यात जमीन वाद आणि फसवणुकीसंदर्भात 530 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये शहरी भागात 315 तर ग्रामीण भागात 215 गुन्हे दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे या कालावधीत 101 जणांची हत्या झाली आहे.