मामा रुग्णालयाबाहेर गेला अन् तिने बाळाला जळत्या कचऱ्यात टाकलं; मन हेलावून टाकणारी घटना
Jharkhand Crime : एका महिलेच्या नातेवाईकांनी मृत बाळाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली असतानाच परिचारिकेने मृतदेह जाळून टाकला आहे. झारखंडमधील माझियान येथे ही घटना घडली असून अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई सुरू केली आहे.
Crime News : झारखंडच्या (Jharkhand Crime) गढवा जिल्ह्यात एक अमानवीय घटना समोर आली आहे. नवजात अर्भकाला (newborn baby) कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. गढवा जिल्ह्यातील माझियान येथे स्थानिक रुग्णालयातील परिचारिकेने कचऱ्यासह नवजात बाळाला जाळले आहे. हे भयंकर कृत्य समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने आरोपी परिचारिकेसह आणखी एका महिलेवर कारवाई सुरू केली. स्थानिकांना ही घटना कळताच त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
गढवा येथील माझियान रुग्णालयात सहाय्यक परिचारिका निर्मला कुमारी आणि मंजू कुमारी यांच्यावर नवजात मुलाचा मृतदेह जाळल्याचा आरोप आहे. पलामू येथील 22 वर्षीय महिलेला शनिवारी दुपारी 3 वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती डॉ. मदन लाल, परिचारिका मंजू देवी, निर्मला देवी आण. दौलत देवी यांच्या देखरेखीखाली झाली. पण जन्मानंतर लगेचच मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी साहित्य आण्यासाठी बाजारात गेले असता, कर्मचाऱ्यांना घरच्यांना न सांगता परिचारिकेने नवजात अर्भकाला आग लागलेल्या कचऱ्यात फेकून दिले.
गर्भवती महिलेचे वडील आणि आई यांनी माध्यमांना सांगितले की, परिचारिकेने आम्हाला मृत मुलाच्या जन्माची माहिती दिली. मृत नवजात अर्भकाच्या मामाने सांगितले की, आम्ही मुलाच्या अंत्यविधीसाठी साहित्य आणण्यासाठी बाजारात गेलो होतो, त्यानंतर नातेवाईकांना न सांगता निर्मला कुमारी, मंजूरी कुमारी आणि दौलत देवी यांनी नवजात अर्भकाला 12 फूट खोल खड्ड्यात फेकून दिले. रुग्णालयाच्या आवारात कचरा टाकण्यासाठी खड्डा तयार केला.त्यानंतर कचऱ्यासह मृतदेह पेटवून दिला. या घटनेचे वृत्त समजताच रुग्णालयासह परिसरात खळबळ उडाली. रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात नातेवाइकांमध्ये तीव्र संताप असून नर्स व दाईवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आरोपी परिचारीका निर्मला कुमारीचे नाव यापूर्वीही वादात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला कुमारी या रुग्णालयामध्ये 6 वर्षांपासून तैनात होत्या. याआधी कस्तुरबा गांधी निवासी शाळेतील विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिला होता. त्यादरम्यान कामावर असलेल्या निर्मला देवी यांनी रजिस्टरमधील नोंदीमध्ये छेडछाड करून मुलाला सोबत नेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर निर्मला कुमारी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. निर्मला देवी यांना 2 वर्षे तुरुंगात राहावे लागले होते.
नवजात बाळाच्या तोंडाला लावली चिकटपट्टी
मुंबईच्या भांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये नवजात मुलं रडू नये म्हणून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. प्रसूतीगृहात काम करणाऱ्या परिचारिकांकडूनच हा प्रकार केला जात असल्याचे उघडकीस आले होते.