नवी दिल्ली : झारखंड येथील कोडरमा येथील 12 वर्षीय मूलीवर कुत्र्यांनी केलेल्या हल्लामुळे प्राण गमावण्याची वेळ आली आहे. ही मुलगी शौचासाठी उघड्यावर गेली असता ही घटना घडली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे जंग जंग पछाडत आहेत. मात्र, अनेक योजना, मोहिमा आणि दावे करूनही सरकारला यात यश येताना दिसत नसल्याचेच या घटनेतून पुढे येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सोमवारी (८ जानेवारी) दिलेल्या माहितीनुसार, ही घटाना कोडरमा जिल्ह्यातील भगवतीडीह गावात रविवारी रात्री घडली. पलिसांनी सांगितले की, प्राण वाचविण्यासाठी मुलीने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, कुत्र्यांच्या झुंडीपुढे तिला यश आले नाही. महत्त्वाचे असे की, योग्य वेळी तिला मदतही मिळू शकली नाही. मुलीसमवेत गेलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती नागरिकांना दिली. त्यांनंतर एकच खळबळ उडाली.


धक्कादायक असे की, ज्या गावात ही घटना घडली त्या कोडरमा या गावासह झारखंडमधील तीन जिल्हे सरकारने नुकते हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषीत केले आहेत. मात्र, अद्यापही गावातील बहूसंख्य लोक हे उगड्यावरच शौचाला जातात. तसेच, गावात अद्यापही पुरेशा प्रमाणत शौचालयाची उभारणी झाली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. तर, या घटनेमुळे सरकारच्या हागणदारीमुक्त जाहीर केल्याच्या घोषणेची पोलखोल झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.