न्यूयॉर्क : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या कन्या आणि उद्योगपती नुसली वाडियांच्या मातोश्री दिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाडिया कुटुंबानं याविषयी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिलीय. वाडियांच्या मागे त्याचे पुत्र नसुली आणि मुलगी डायना तसंच नेस आणि जेह ही नातवंड असा मोठा परिवार आहे.


दीना वाडिया यांचा जन्म १९१९ मध्ये १४-१५ ऑगस्टच्या रात्री झाला होता. दीना ही जिना यांची एकुलती एक मुलगी... त्यांनी जिना यांच्या इच्छेविरुद्ध जात मुंबईच्या पारसी कुटुंबातील नेविल वाडिया यांच्यासोबत विवाह केला होता. रतनबाई पेटीट - जिना असं त्यांच्या आईचं नाव... रतनबाई या सर कॉटन मिल संस्थापक दिनशॉ पेटिट यांच्या कन्या... 


१९४७ नंतर देशाच्या विभाजनानंतर त्यांनी भारतातच राहणं पसंत केलं. त्यानंतर त्या अमेरिकेत निघून गेल्या. जिना यांच्या निधनानंतर त्यांनी पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी आणखीन एक पाकिस्तान दौरा केला होता. 


मुंबईतल्या जिना हाऊसमध्ये शेवटचे दिवस व्यतित करण्याचा दीना वाडिया यांचा मानस होता. २०१० मध्ये वा़डिया कुटुंबानं मुंबई उच्च न्यायालयात जिना हाऊसचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पण दिना वाडियांची ही इच्छा अपूर्णच राहिली.