मुंबई : कोरोनावर लसीकरण हा महत्वाचा उपाय म्हणून समोर आला आहे. यासाठी लसीकरणाचा शोध लागल्यानंतर प्रत्येक देश आपल्या देशातील लोकांना लसाकरण करण्याकडे भर देत आहे. भारतानेही या मोहिमेला जोरदार सुरवात केली. सुरवातीला लसीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर लसी बद्दल जागरुकता निर्माण करण्यावर केंद्र आणि राज्य सरकारने भर दिला. परंतु लसीसे उत्पादन कमी होत असल्याने भारताच्या लोकासंख्ये पुढे ते कमी पडू लागले. त्यामुळे देशतील काही भागात लसीकरण थांबवण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करत सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केले आहे.


दरम्यान टेलीकॉम कंपनी, रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना कोरोना लसीच्या उपलब्धते विषयी जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिओने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवरुन आपल्या ग्राहकांना कोव्हिड -19 लस आणि इतर ग्राहक सेवा देण्यास सुरवात केली आहे.


यूझर्सना या सुविधा मिळतील


जीओने सुरु केलेल्या या नवीन सेवेद्वारे, सेशन रीफ्रेश करण्यासाठी Jio युजर्स वन-टाइम पासवर्डच्या त्रासातून वाचतील. ही सेवा त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कोरोना लसीच्या उपलब्धते बद्दल माहिती मिळवण्यात मदत करेल.


कंपनीच्या एका सूत्राने सांगितले की, 'जिओ यूजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर जियो चॅटबॉटवर रिचार्ज करू शकतात, पेमेंट करू शकतात, प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. याशिवाय तक्रार देखील दाखल करु शकतात. ही सेवा कोव्हिड -19 या लसीच्या उपलब्धते विषयी ही माहिती देते.


तुम्हाला जर ही सेवा तुमच्या फोनमध्ये हवी असल्यास, तुम्हाला एक सोपे काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला 7000770007 या क्रमांकावर फक्त 'Hi'टाइप करावे लागेल. यानंतर कंपनी तुमचा या सेवेमध्ये समावेश करुन घेईल आणि तुम्हाला वेळोवेळी नोटीफिकेशन मिळेल.


जिओ युजर्सना मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा, जियो सिम, जिओ फाइबर, जियोमार्ट आणि चॅटबॉटवर आंतरराष्ट्रीय रोमिंगसाठी मदत मिळू शकेल.