नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. मांझी यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, 'फोनवर अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं. पण आज जाऊन भेट घेतली.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांझींनी म्हटलं की 'ही एक शिष्टाचार भेट होती. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि बिहारला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.'


माजी मुख्यमंत्री मांझी यांनी म्हटलं की, 'भेटीदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमारांनी म्हटलं की, मागच्या गोष्टी विसरुन जा. तर मी म्हटलं की, मी आधीच आधीच्या गोष्टी विसरुन गेलो आहे. आता आपण सोबत मिळून काम करु.'