श्रीनगर : जम्मूच्या सुंजवामध्ये वर्षातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. नऊ तासांनंतरही लष्कर छावणीत दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरुच आहे. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले तर चौघे जखमी झाले आहेत.


दहशतवाद्यांना प्रत्युत्तर द्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मूतल्या सुंजवामध्ये नऊ तासांनंतर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरुच आहे. दहशतवाद्यांना कठोर शब्दांत प्रत्युत्तर द्यायला हवं, अशी प्रतिक्रिया संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होतेय. 


भारतीय सैन्याच्या छावणीला केलं लक्ष्य



जम्मूत सुंजवामध्ये नऊ तासानंतरही भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. दहशतवाद्यांनी पहाटे पाचच्या सुमारास भारतीय सैन्याच्या छावणीला लक्ष्य केलंय यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवानांना वीरमरण आलंय. लष्कराचे जेसीओ मदनलाल आणि जवान मोहम्मद अशरफ शरीफ हे शहीद झालेत.


याशिवाय दहशतवाद्यांच्या गोळीबारात चार जण जखमी झालेत. जखमींमध्ये एक जवान आणि लहान मुलीचाही समावेश आहे. सुंजवा इथल्या लष्करी छावणीवर हा हल्ला झाला. यावेळी ३ ते ४ दहशतवादी घुसल्याची माहिती मिळतेय.


अंदाधुंद गोळीबार, ग्रेनेड हल्ला


दहशतवाद्यांनी यावेळी अंदाधुंद गोळीबार केला तसंच ग्रेनेड हल्ला केल्याचंही बोललं जातंय. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारलीय. या घटनेनंतर जम्मूमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. 


गृहमंत्रालय इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छावणीच्या ५०० मीटर परिसरातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.