नवी दिल्ली : दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढणार आहेत. फी वाढीविरोधात जेएनयूमध्ये गेले दोन आठवडे आंदोलन सुरू आहे. सरकारने काही प्रमाण फी वाढ मागे घेतली आहे. पण पूर्ण फीवाढ मागे घेण्याची या विद्यार्थ्यांची मागणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा कडक बंदोबस्त ठेवला आहे. जवळपास बाराशे पोलीस या आंदोलनासाठी तैनात असणार आहेत. या विद्यार्थ्यांना जेएनयूबाहेरच पडू न देण्यासाठी गेटवरच दोनशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.