नवी दिल्ली : नोकरीचा शोध अनेक वर्षांसाठी संपत नाही, असे अनेकजण आपण पाहिले आहेत. आजकाल काही अशीही मंडळी आहेत जे सध्या कार्यरत असणाऱ्या क्षेत्रांतून दुसऱ्याच क्षेत्रात प्रगती करु इच्छित आहेत. अशा व्यक्तींसाठी इएसआयसीकडून नोकरीच्या नव्या संधी सादर करण्यात आल्या आहेत.(Employees State Insurance Corporation, ESIC Recruitment 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इएसआयसीच्या या नोकरीसाठी पात्र असणारे उमेदवार तब्बल 3847 पदांसाठी नोकरीचा अर्ज दाखल करु शकणार आहेत. 


अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना UDC, MTS, Steno अशा पदांवर नोकरीची संधी उपलब्ध आहे. 


अर्ज दाखल कसा करावा, त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे याची सविस्तर माहिती esic.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 


15 जानेवारी 2022 पासून यासाठीचे अर्ज दाखल करता येऊ शकतात. 


साधारण महिन्याभरासाठी ही अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. थोडक्यात 15 फब्रुवार 2022 पर्यंच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असेल. 


सदर नोकरीसाठीची पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचं स्वरुप या साऱ्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे 


परीक्षेच्या जाहिरातीची अंतिम तारीख - 28 डिसेंबर 2021 


अर्ज करण्याची पहिली तारीख - 15 जानेवारी 2022


अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 15 फेब्रुवारी 2022


परीक्षेची तारीख - लवकरच जाहीर करण्यात येईल 


UDC आणि स्टेनो या पदांसाठी विविध स्तरांवर पगाराची मर्यादा 25,500-81,100 रुपये इतकी असेल. 


MTS साठी ही मर्यादा 18,000-56,900 रुपये इतकी असेल. केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे हा आकडा वरखाली असेल. 


कोणत्या पदासाठी किती जागा? 


इएसआयसीमध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत? 


UDC - 1726


स्टेनो- 163


एमटीएस- 193


शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा


नोकरीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं वय 18 वर्षे ते 27 वर्षांदरम्यान असावं. अर्जदाराचं शिक्षण 10 वी उत्तीर्ण, 12 उत्तीर्ण किंवा वैध विद्यापीठातून पदवीधारक इतकं असावं. 


नोकरीच्या पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. 


पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि संगणक चाचणी अशा धर्तीवर अर्जदारांनी निवड इएसआयसीच्या पदांवर करण्यात येणार आहे.