मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये, कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, पुन्हा एकदा आर्थिक उपक्रम सुरू झाल्यामुळे त्यात सगळं काही सुरळीत होऊ लागलं आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी नोकऱ्यांची कमतरता नाही. अट अशी आहे की जर तुम्हाला या क्षेत्रातील काही वर्षांचा अनुभव असेल तर तुमच्या हातात एकापेक्षा जास्त नोकरीच्या ऑफर असण्याची सर्व शक्यता आहे. हेच कारण आहे की, या क्षेत्रात लोकं राजीनामा देऊन दुसरी नोकरी पकडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तथापि, असेही सांगितले जात आहे की, नियुक्तीसाठी पुरेसे पात्र लोक नाहीत. म्हणूनच कंपन्या देखील पात्र उमेदवारांना कामावर ठेवण्यासाठी विविध ऑफर देऊन त्यांना कामावर ठेवण्याचा कंपनीकडून केला जातो. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना जॉइनिंग बोनसही दिला जात आहे.


मूल्यांकन चाचणीसाठी पैसे मिळत आहेत


मीडिया रिपोर्ट्स नुसार,  फिनटेक फर्म BharatPe कंपनी नवीन प्रवेश करणाऱ्यांना BMW बाईक देत आहे. याशिवाय, काही कंपन्या आयफोन आणि फ्लेक्सी-वर्किंग टाईमींग देखील देत आहेत. या कंपन्या काही उमेदवारांना त्यांच्या मूल्यांकन चाचणीला उपस्थित राहण्यासाठी 1हजार ते 5 हजार रुपये देत आहेत.


आयटी कंपन्यांमध्ये टॅलेंटची मागणी वाढली


सल्लागार कंपन्यांचे म्हणणे आहे की, एप्रिल महिन्यापर्यंत या आयटी कंपन्यांकडून उमेदवारांची मागणी 5 हजारांच्या आसपास होती, परंतु आता ती जूनच्या अखेरीस 20 हजारपर्यंत वाढली आहे.


TCS (Tata Consultancy Services), इन्फोसिस (Infosys), एचसीएल (HCL Technologies) आणि विप्रो सारख्या कंपन्या चालू आर्थिक वर्षात एकूण 1 लाख लोकांना रोजगार देतील अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त, कॉग्निझंट (Cognizant)  या वर्षी 1 लाख अनुभवी आणि 30 हजार फ्रेशर्स उमेदवारांची नियुक्ती करणार आहे.


अधिक कार्यक्षम, अधिक ऑफर


कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या दोन महिन्यांत आयटी क्षेत्रात इतक्या नोकऱ्या नव्हत्या. बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी लोकांना कामावरुन कमी केले. पण शेवटच्या तीन महिण्यात प्रतिभावंत लोकांची मागणी वाढली आहे.


सध्या, निवडलेल्या सर्व उमेदवारांपैकी सुमारे 30 ते 50 टक्के जॉब ऑफर नाकारत आहेत. उमेदवार जितका कुशल असेल तितका त्याच्याकडे अधिक ऑफर असतात. त्यामुळे मग कंपन्यांना त्यांच्या उमेदवारांना काही ना काही ऑफर देऊन आपल्याकडे थांबवायचे असते.