रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करण्याचा कालावधी वाढवला
रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत.
नवी दिल्ली : रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध असून ९० हजार जागा उपलब्ध आहेत. या ९० हजार भरतीसाठी आवेदन करण्यासाठी उमेदवारांना अधिक वेळ मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे विभागाकडून वयोमर्यादा आणि योग्यता संबंधीत नियम शिथिल करण्यात आले आहेत.
ITI ची अनिवर्यता नाही
तरुणांना मोठा दिलासा देत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या ग्रुप डीच्या पदासाठी आयटीआयची अनिवर्यता रद्द करण्यात आली आहे.
ग्रुप सी, डी साठी वाढवली वयोमर्यादा
सुमारे तीन दिवसांपूर्वी गोयल यांनी ग्रुप सी आणि डी पदाच्या जनरल व आरक्षित कोर्टच्या अधिकतम वयोमर्यादा दोन वर्ष वाढवण्यात आली आहे. देशभरातील विरोधानंतर रेल्वे बोर्डाने वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जाचे शुल्क
आरक्षित आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी आवेदन शुल्क ५०० रुपये आहे. तर एससी/ एसटी/ भूतपूर्व सैनिक/ महिला/ ट्रांस जेंडर या सर्वांसाठी २५० रुपये आवेदन शुल्क आहे. हे रक्कम तुम्ही इंटरनेट बॅंकींग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड या माध्यमातून करु शकता.