मुंबई : इलेक्ट्रॉनिक घटक बनवणारी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि इतर आघाडीच्या इंजीनिअरिंग संस्थांमधून 1 हजार इंजिनीअर भरती करण्याची योजना आखत आहे. सॅमसंग कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 2022 मध्ये पदवीधर तरुण इंजिनीअर्सना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्लाउड डेटा विश्लेषण यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रात नियुक्त केले जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहितीनुसार सॅमसंग दिल्ली, कानपूर, मुंबई, मद्रास, गुवाहाटी, खड़गपुर, BHU, रुडकी आणि इतर नवीन IIT कॅम्पसमधून तिच्या तीन R&D केंद्रांसाठी (बेंगळुरू, नोएडा आणि दिल्ली) सुमारे 260 तरुण इंजिनीअरची भरती केली जाईल. उर्वरित भरती कंपनी BITS पिलानी, IIT (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि NIT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सारख्या इतर इंजिनीअरिंग संस्थांमधून करेल.


1 हजार इंजिनीअर भरती


सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख  समीर वाधवन म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारतातील संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्र खूप विकसित झाले आहे. "आम्ही 1 हजाराहून अधिक इंजिनीअर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे."


भारतातील सॅमसंगच्या R&D केंद्रांवर भरती करणार्‍यांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्याविषयी बोलताना वाधवन म्हणाले की, पेटंट फाइलिंगच्या कंपनीच्या मजबूत संस्कृतीमुळे भारतात आतापर्यंत 3 हजार 500 पेक्षा जास्त पेटंट फाइलिंगसह जागतिक स्तरावर 7 हजार 500 पेटंट दाखल झाले आहेत. पेटंट मंजूर करण्यात आले आहेत.


ते म्हणाले की, मिलेनियल्स सर्वाधिक पेटंट दाखल करत आहेत, ज्यात 50 टक्के पेटंट प्रथमच शोध घेणारे आणि 27 टक्के शोधकांना पाच वर्षांपेक्षा कमी अनुभव आहे.


याशिवाय, आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीचे व्यासपीठ देण्यासाठी, सॅमसंग BITS पिलानीसह IIIT-B आणि M Tech प्रोग्राम्ससह अनेक अपस्किलिंग प्रोग्राम ऑफर करते आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन ट्रेंड शिकण्यासाठी आणि त्यात योगदान देण्यासाठी आम्ही काम करणार आहे.