जोधपूर:  जनतेमध्ये इतका जनक्षोभ उसळला तरीही देशातील नराधमांना त्याचे काहीच वाटत नाही. देशात सुरू झालेली बलात्कारांची मालिका अद्यापही संपण्याचे चिन्ह नाही. उन्नाव, कठुआ आणि सुरत येथे झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देश ढवळून निघाला असतानाच आता राजस्थानातही बलात्काराची आणखी एक घटना घडल्याचे पुढे आले आहे. ही घटाना जोधपुर येथे एका चार वर्षाच्या मुलीसोबत खाऊच्या आमिषाने घडल्याची माहिती आहे. 


आरोपिंविरूद्ध गुन्हा दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोधपुर येथील असिस्टेंट कमिश्नर ऑफ पोलिस (एसीपी)कमल सिंग यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, चार वर्षाच्या एका मुलीला खाऊ देण्याच्या अमिशाने एकांतात बोलवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी शास्त्रिनगर परिसरातील दोन लोक मुलीला खाऊचे आमिष दाखवून घेऊन गेले आणि त्यांनी तिच्यावर (बलात्कार) अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.


दोन्ही आरोपी बिहारचे


एसपींनी पुढे म्हटले आहे की, दोन्ही आरोपींविरोधात भादंस करलम ३७६ आणि एसस-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही आरोपी हे बिहारचे राहणारे आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्यास आरोपीला मृत्यदंडाची शिक्षा देण्याचा कायदा विधानसभेत मंजूर झाला आहे.


६५ वर्षीय महिलेवरही बलात्कार


दरम्यान,  राजस्थानमध्ये ६५ वर्षीय महिलेवरही बलात्कार झाल्याची आणखी एक घटना पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, भीलवाडा येथील सुभाष नगर पोलीस स्तानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.