नवी दिल्ली : जर तुम्हाला होम लोन घेण्यास अडचण येत असेल तर जॉइंट होम लोन तुमच्या अडचणी सोडवू शकते. बँक दोन्ही ऍप्लिकंटचे इनकम आणि क्षमता जोडून पाहू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा होम लोन रिजेक्ट होत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. जॉइंट होम लोन अशा वेळी उत्तम पर्याय ठरतो. तज्ज्ञांच्या मते जॉइंट होम लोन घेतल्याने जास्त लोन तर मिळतेच परंतु टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळते. को - ऍप्लिकंटसह होम लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊ या...


सहज मिळते होम लोन
क्रेडिट स्कोर ठिक नसल्याने लोन घेण्यात अडचणी येऊ शकतात. अशा स्थितीत कोणत्याही दूसऱ्या व्यक्तीला आवेदक म्हणून जोडल्याने लोन घेण्याच्या क्षमतेत वाढ होते. जर तुम्ही अशा व्यक्तीसोबत मिळून जॉइंट होम लोनसाठी अप्लाय करीत असाल तर ज्याचा क्रेडिट स्कोअर मजबूत आहे. तर तुम्हाला होम लोन घेताना अडचणी येत नाही. शिवाय तुम्हाला होम लोन देखील अधिक मिळू शकते. 


फायदे
1 लोन घेण्याची योग्यता वाढते
2 जास्त मोठे घर खरेदी करू शकता 
3 जास्त टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.
4 तुम्ही तुमच्या मनपसंत जागी घर खरेदी करू शकता.
5 महिलांना को ऍप्लिकंट केल्याने कमी व्याज दराचा लाभ
6 को ऍप्लिकंट असल्याने लोन अप्रुव्ह होण्याची शक्यता वाढते.


कोण बनू शकते को - ऍप्लिकंट?
साधारणतः कुटूंबाचे जवळचे सदस्य को ऍप्लिकंट बनू शकतात. याप्रकारे नवरा/बायको/ भाऊ/बहिण किंवा मुलांना ऍप्लिकंट बनवता येते.को-ऍप्लिकंट पगारदार किंवा सेल्फ एम्लॉइड असू शकतो.


को-ऍप्लिकंट आणि को-ओनर मधील फरक
को ऍप्लिकंट आणि को ओनरमधील अंतर समजून घेण्याची गरज आहे. को-ओनर त्या प्रॉपर्टीचा भागीदार मालक असतो. परंतु को ऍप्लिकंट त्या प्रॉपर्टीचा मालक असणे गरजेचे नसते. 


इनकम टॅक्समध्ये सूट
बहुतांश घर खरेदीदारांना होम लोनवर इनकम टॅक्स ऍक्ट सेक्शन 80 C आणि 24 Bअंतर्गत मिळाणारे टॅक्स बेनफिट बाबत माहिती असते. 
लोन घेणारी व्यक्ती सेक्शन 24 B अंतर्गत व्याजाला प्रत्येक वर्षी 2 लाख रुपयांपर्यंतच्या डिडक्शनसारके घेऊ शकतात. परंतु प्रिंसिपल अमाउंटवर सेक्शन 80C अंतर्गत एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन मिळते. संयुक्त होम लोनच्या बाबतीत आवेदन केल्याने दोन्ही कर्ज घेणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या इनकम टॅक्स बेनफिटचा फायदा घेऊ शकतात.