पटना : आजकाल प्रेम करणे हा गुन्हा झाला आहे. कधी एकतर्फी प्रेमातून मुलींवर अत्याचार होतात. तर कधी सामाजिक प्रतिष्ठा, पालकांचा इगो मुलांच्या प्रेमाच्या आड येतो. अशीच एक घटना बिहारमधून समोर येत आहे.


काय आहे हे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या खगडिया जिल्हाचे जज सुभाष चंद्र चौरसिया यांनी आपल्या २४ वर्षीय मुलीला घरात कैद केले आहे. तिची चूक इतकीच की, ती सिद्धार्थ बंसल नावाच्या एका वकीलावर प्रेम करते. राजस्थान पत्रिकामधील वृत्तानुसार, कायदेशीर वेबसाईट 'बार अँड बेंच' वरुन ही माहिती समोर आली. तेव्हा पटना हायकोर्टाने या प्रकरणात लक्ष घातले.


 न्यायाधीशांवर कठोर टीका


मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश रंजन प्रसाद यांनी जिल्हा न्यायाधीशांवर कठोर टीका केली. आम्हाला लाज वाटते की तुमच्यासारखे लोक आमच्यासोबत काम करतात, असे खडे बोल त्यांना सुनावण्यात आले. त्याचबरोबर हायकोर्टाच्या मंगळवारच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांच्या मुलीला लॉ युनिव्हर्सिटीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.