रोहतक :  डेरा प्रमुख गुरमित राम रहीम याला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा देणाऱ्या न्यायधिश जगदीप सिंह यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीआहे.  न्या. सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यासाठी १० कमांडो आणि ५५ पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. 


न्या. जगदीप सिंह यांना त्याची इमानदारी आणि कडक स्वभावामुळे ओळखले जाते. या हायप्रोफाईल केसमध्ये डेऱ्याचे समर्थक आणि राजकीय दबाब होता. तसेच पंचकुलामध्ये हिंसेसाठी जमा झालेल्या २ लाख समर्थकांचाही होता. असे असताना त्यांनी न डगमगता दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात गुरमितला कारवासात पाठविण्याचा निर्णय दिला. 


कडक स्वभाव... 
न्या. जगदीप यांचा इतका कडक स्वभाव आहे की त्यांनी गुरमितला दोषी ठरविल्यानंतर कोर्ट रूममध्ये फक्त काही वकील आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राहायला सांगितले, इतरांना कोर्ट रूमच्या बाहेर जाण्यास सांगितले.