इंदोर : एमजीएम मेडीकल कॉलेजमध्ये एनेस्थीसियाचं शिक्षण घेणाऱ्या ज्यूनियर डॉक्टरने अधिक प्रमाणात औषधाची मात्रा घेत, जीवन संपवलं आहे. मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात राहणाऱ्या ज्युनियर डॉक्टर टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डॉक्टर तरुणी गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होती. तरुणी इंदोरमध्ये एका खासगी वसतिगृहात राहत होती. एवढंच नाही तर, तिच्या खोलीतून सुसाईड नोट देखील मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुसाईड नोटमध्ये तरुणीने 'लव्ह यू मम्मी पप्पा...' लिहिले असून आत्महत्येचे कारण लिहिले आहे. तरुणी शनिवारी रात्री एमवाय हॉस्पिटलमधून हॉस्टेलमध्ये परतली होती. खोलीत जाण्यापूर्वी तिने हॉस्टेलच्या वॉर्डनशी गप्पा देखील मारल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर जाण्यासाठी तरुणीला मैत्रिणीने कॉल केला, तेव्हा तिने फोन उचलला नाही. 


त्यानंतर अनेकवेळा तरुणीला मैत्रिणीने फोन केले. पण समोरून उत्तर मिळत नसल्यामुळे तरुणीची मैत्रिण थेट हॉस्टेलमध्ये पोहोचली. तेव्हा तरुणी बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यानंतर तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. तरुणीने सुसाईड नोटमध्ये तिच्या मृत्यूचे कारण नमूद करत आय लव्ह यू मम्मी पापा असे लिहिले आहे. 


याशिवाय इंग्लिशमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाची माफी मागून मी स्वतःशीच लढण्यात अपयशी ठरले... असे लिहिले होते. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.