ओटावा : कॅनडामध्ये ज्युनिअर आईस हॉकी टीमच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झालाय. सस्कातचेवान प्रांतात ट्रॅक्टर ट्रेलरला ही बस धडली. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर १४ जण गंभीर जखमी झालेत... जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडाच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बस हमबोल्डट ब्रोनकोसच्या खेळाडूंना घेऊन उत्तरेकडे जात होती. टीमला सस्कातचेवान ज्युनिअर हॉकी लीगमध्ये निपाविन हॉक्स विरुद्ध प्लेऑफ सामना खेळायचा होता. 


दुर्घटनाग्रस्त बसमध्ये चालकासहीत २८ जण प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ट्रॅक्टर ट्रेलर आणि बसच्या धडकेमुळे हा अपघात झालाय... ही इतकी मोठी दुर्घटना आहे ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल'


ब्रोनकोस टीममध्ये कॅनडाचे १६ ते २१ वर्षांचे २४ खेळाडू आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तरुण खेळाडूंच्या या दु:खद घटनेवर शोक व्यक्त केलाय. 'मी कल्पनाही करू शकत नाही की या खेळाडूंच्या आई-वडिलांची सध्या काय परिस्थिती असेल... हमबोल्डट समुदाय आणि यातील पीडितांच्या दु:खात मी सहभागी आहे' असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. 


उल्लेखनीय म्हणजे, आईस हॉकी कॅनडाचा राष्ट्रीय खेळ आहे....