नवी दिल्ली :  रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यावर सुरूवातीच्या काही तासात त्यांना ट्विटरवर ३२ लाख ७० लाख लोकांनी फॉलो केले. कोविंद राष्ट्रपतीपदाची शपथ घेत असताना त्यांच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्याने वाढत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ज्या ट्विटर हँडलचा वापर  करत आहे, तो @rashtrapatibhvn च्या पत्त्यावर आहे. हा राष्ट्रपती भवनाचा कायम स्वरूपी पत्ता आहे. राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर या आयडीवरून पहिला ट्विट करण्यात आला. यात त्यांनी कर्तव्याचे निर्वहन करण्याचे सांगितले आणि शपथ ग्रहण केल्याची माहिती दिली. 


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या ट्विटर पत्त्याचा वापर करत होते. आता प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना करण्यात आलेले सर्व ट्विट हे आर्काव्ह म्हणून @POI13 वर शिफ्ट करण्यात आले आहे. या ट्विटर हँडलवर अखेरचे ट्विट २४ जुलैला करण्यात आले होते. यात त्यांनी पद सोडण्याबद्दल बोलले होते. ते म्हणाले आता ते राष्ट्रपती राहणार नाही पण सामन्य नागरिकाप्रमाणे सर्वांमध्ये राहणार आहे.  प्रणवदांच्या ट्विटर आयडीवर ३३ लाख १० हजार फॉलोवर्स आहेत.