नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी राजे सिंधिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंधिया यांना खोकला आणि ताप ही लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी राजे सिंधिया यांना ४ दिवसाआधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. पण त्यांच्या आईमध्ये कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.


लॉकडाऊनपासूनच ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दिल्लीत आहेत. पण चार दिवसांपूर्वी अचानक ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाचे लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसचे महासचिव होते. पण त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधिया भाजपमध्ये आल्यानंतर मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पडलं. भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.