काँग्रेस सोडण्यापूर्वी ज्योतिरादित्य यांचं सोनियांना पत्र .... वाचा
काँग्रेस पक्षासाठी आज धक्का देणारा दिवस ठरला आहे. कारण मध्य प्रदेशातील दिग्गज काँग्रेस नेते ज्योतिरादित्य काँग्रेस
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षासाठी आज धक्का देणारा दिवस ठरला आहे. कारण मध्य प्रदेशातील दिग्गज काँग्रेस नेते ज्योतिरादित्य काँग्रेस सोडताना ज्योतिरादित्य यांचं सोनियांना लिहिलेलं पत्र
सिंधिया हे भाजपमध्ये सामिल झाले आहेत. तत्पूर्वी काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत, ज्योतिरादित्य सिंधिया यांची काँग्रेसपक्षातून हकालपट्टी केली आहे. याच दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडताना सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेलं आहे.
प्रिय सोनिया गांधीजी,
मी मागील 18 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य राहिलो आहे. आता मला पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आपल्याला माहितच आहे, मागील वर्षभरातील घटनांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
असं असलं तरी माझ्या देशातील आणि राज्यातील जनतेची सेवा हेच, माझं सुरूवातीपासून ध्येय आणि उद्देश राहिलं आहे. या पक्षात राहून मी ते पूर्ण करू शकेन, असं मला वाटत नाही.
माझी जनता आणि कार्यकर्ते यांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी मला आता नव्याने सुरूवात करणंच अधिक चांगलं राहिल.
देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल, तुम्ही आणि पक्षातील सहकारी यांचा मी आभारी आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया
10 मार्च 2020
ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपकडून केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.