मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत दमदार ठरलेले काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. ४८ वर्षांचे ज्योतिरादित्य आपल्या राजकीय कारकीर्दीमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी १९९३ साली हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रातून पदवी संपन्न केली. त्यानंतर २००१ साली स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एबीएही पूर्ण केलं. ३० सप्टेंबर २००१ रोजी वडील माधवराव शिंदे यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात उतरले... परंतु, त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. 


ज्योतिरादित्य आपल्या कुटुंबासोबत

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य यांनी प्रियदर्शिनी शिंदे यांच्याशी विवाह केलाय. १९९१ साली काही कारणास्तव ज्योतिरादित्य मुंबईला आले होते. ते एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये उतरले. इथंच प्रियदर्शिनी यांच्याशी ज्योतिरादित्य यांची पहिली भेट झाली... पहिल्याच भेटीत ज्योतिरादित्य प्रियदर्शिनी यांच्या प्रेमात पडले होते. १२ डिसेंबर १९९४ रोजी या दोघांनी आपल्या कुटुंबीयांच्या संमतीनं विवाह केला.


ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी शिेंदे

 


ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी १८७४ मध्ये युरोपियन शैलीत उभारलेल्या एका महालात राहतात. 'जयविलास पॅलेस' असं त्याचं नाव... या शाही महालात ४०० खोल्या आहेत. महालाच्या छतावरच्या नक्षीत सोन्यानं काम केलंय. या महालाच्या ४० खोल्या सध्या म्युझियम स्वरुपात पाहायला मिळतात. 


प्रियदर्शिनी शिंदे

प्रियदर्शिनी यांचा जन्म गुजरातच्या बडोद्याचा... गायकवाड मराठा राजघराण्याच्या त्या राजकुमारी आहेत. त्यांचे वडील कुमार संग्रामसिंह गायकवाड बडोद्याचे शेवटचे शासक प्रताप सिंह गायकवाड यांचे पुत्र... प्रियदर्शिनी यांची आई नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांचं शिक्षण मुंबईच्या फोर्ट कॉन्वेन्ट स्कूल आणि सोफिया महाविद्यात झालंय. उल्लेखनीय म्हणजे, २०१२ साली 'फेमिना'नं प्रियदर्शनी यांच्या नावाचा भारताच्या ५० सुंदर महिलांच्या यादीत समावेश केला होता. 


प्रियदर्शिनी शिंदे मुलगी अनन्यासोबत

प्रियदर्शिनी बहुतेकदा मीडियाला टाळतातच... पण, सोबतच त्या स्वत:ला सामाजिक कार्यात व्यस्तही ठेवण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाही तर ग्वालियरमध्ये राहून शिंदे घराण्याचं सर्व काम प्रियदर्शनीच पाहतात. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शनी या जोडप्याला एक मुलगा आर्यमन आणि एक मुलगी अनन्या आहे.