नवी दिल्ली : कैराना लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान सकाळपासून सुरू आहे. शांततेने मतदान होण्यासाठी मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कैराना लोकसभेमध्ये साधारण १६ लाख मतदार आहेत. कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत १२ जागांसाठी हे मतदान होत आहे. भाजपा खासदार हुकुम सिंह यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ११३ पूलिंग बूथ वर मशीन खराब झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा खरच तांत्रिक बिघाड आहे की कोणत्या राजकीय पक्षाची खेळी आहे ? याबद्दल येणाऱ्या काळातच कळणार आहे. मतदानचा निकाल ३१ मेला लागणार आहे. या सीटवर भाजपाच्या उमेदवार मृगांका सिंह आणि तबस्सुम हसन यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे.



सपा आणि रालोद यांच्या युतीला इतर सर्व पार्टींनी समर्थन दिलयं.