Kala Namak Rice Export: काळं मीठ तांदूळ हा एक पौष्टीक धान्याचा प्रकार आहे. अनेक आजारांसाठी हे लाभकारी मानले जात असल्याने डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात. दरम्यान काळं मीठ तांदळासंदर्भात सरकारकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे. भारतामध्ये काळ मीठ तांदूल उत्तर प्रदेशच्या अलिदाबाद आणि हरियाणाच्या काही भागात पिकवला जातो. साधारण सफेद तांदळाच्या तुलनेत हा तांदूळ 4 ते 5 पट किंमतीने विकला जातो. आता सरकारच्या एका निर्णयामुळे हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने नेमलेल्या सीमाशुल्क केंद्रांद्वारे 1,000 टन पर्यंत काळं मीठ तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. काळे मीठ हे गैर-बासमती तांदळाचे एक प्रकार असून याची निर्यात प्रतिबंधित होती. त्यामुळे हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळत नव्हता. पण सरकारने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. असे असले तरी याची सरसकट निर्यात करता येणार नाही. सरकारचे नोटिफिकेशन लागू झाल्याच्या तारखेपासून काळ्या मिठाच्या तांदळाच्या एकूण प्रमाणात फक्त 1,000 टनांच्या मर्यादेपर्यंतच निर्दिष्ट सीमाशुल्क स्थानकांद्वारे निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आपल्या नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. 


लखनौ कृषी विपणन आणि विदेशी व्यापार संचालक हे काळे मीठ तांदूळ आणि त्याचे प्रमाण प्रमाणीकरण करणार आहेत. सहा सीमाशुल्क स्थानकांद्वारे या प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये वाराणसी एअर कार्गो, महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू कस्टम हाउस, गुजरात कांडला येथील कस्टम हाऊस,  नेपाळगंज रोड येथील लँड कस्टम स्टेशन आणि एलसीएस बर्हानी या स्थानकांचा समावेश आहे. 


काळे मीठ तांदळाचे गुणधर्म 
काळे मीठ तांदळात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचा वापर आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो. या तांदळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पांढऱ्या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळ्या तांदळात लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि जस्त जास्त असते.


असे म्हणतात की, काळे मीठ तांदूळ सहाशे वर्षापुर्वी आपल्या देशात आढळले. याला भगवान बुद्धाचा महाप्रसाद किंवा द बुद्धा राइस म्हटले जाते. उत्तर प्रदेश आणि नेपाळचे पारंपारिक शेतकरी याचे पिक घेतात.