चेन्नई : अभिनेता ते नेता बनलेले कमल हासन यांनी म्हटलं की, 'त्यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम (एमएनएम) 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवणार आहे.' एमएनएम प्रमुख कमल हासन यांनी म्हटलं की, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षासोबत युती करण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हासन यांनी म्हटलं की, 'पक्षाच्या लोकांसोबत चर्चा केल्यानंतर समविचारी पक्षासोबत युती करण्याचा निर्णय झाला आहे.' याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात कमल हासन यांनी पक्षाची स्थापना केली होती. पण कमल हासन हे स्वतंत्र निवडणूक लढवण्याऐवजी युती करणार आहे.


एमएनएमसोबत कोणता पक्ष युती करु शकतो याबाबत त्यांना विचारलं असता. त्यांनी म्हटलं की, 'आता याबाबत  सविस्तरपणे काही सांगता येणार नाही. निर्णय झाल्यानंतर याबाबतची घोषणा केली जाईल.'