कमल हसन करणार चाहत्यांचा पैसा परत
तमिळ सुपरस्टार कमल हसनने जाहीर केलयं की तो चाहत्यांनी नवीन पक्ष सुरू करण्यासाठी देणगीरुपाने दिलेला पैसा परत करतोय.
चैन्नई : तमिळ सुपरस्टार कमल हसनने जाहीर केलयं की तो चाहत्यांनी नवीन पक्ष सुरू करण्यासाठी देणगीरुपाने दिलेला पैसा परत करतोय.
तमिळ साप्ताहिकातील लेख
एका तमिळ साप्ताहिकात कमल हसनने यासंदर्भात आपला इरादा स्पष्ट केलायं.
नवीन पक्ष सुरू करण्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचं कमलने म्हटलयं. नवीन पक्षाची यंत्रणा उभी राहीपर्यंत चाहत्यांचा पैसा स्वत:जवळ ठेवणं योग्य नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.
जुलै महीन्यात कमल हसनने आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती.
लवकरचं नवीन पक्ष
पण याचा अर्थ आपला राजकारणात प्रवेश करणार नाही असा नसून, आपण लवकरचं पक्षाची स्थापना करू असं कमल हसनने स्पष्ट केलयं.
हिंदू टेररविषयी कमल
हिंदू टेररविषयी कमलच्या मतावरून वाद निर्माण झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना कमल हसनने म्हटलयं की तो स्वत: एका हिंदू कुटुंबातून आहे. हिंदूनी मोठ्या भावाच्या भूमिकेतून पाहावं असं आपलं मत असल्याचं त्यानं म्हटलयं.