नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका भाषणादरम्यान केलेलं विधान किती वाईट होतं. हे खुद्द राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरुन स्पष्ट होतं. पण याचा कमलनाथ यांना काहीही फरक पडत नसल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमलनाथ यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षात नाराजी आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना देखील यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. कमलनाथ यांचं विधान दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, मला अशी भाषा आवडत नाही असे देखील राहुल गांधी म्हणाले.


राहुल गांधी म्हणाले की, "कमलनाथांचे म्हणणे मला आवडले नाही. मला कमलनाथांची भाषा अजिबात आवडली नाही." राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर ही कमलनाथ यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.


कमलनाथ म्हणाले की, त्यांनी कोणतीही शिवीगाळ केली नाही. कमलनाथ यांनी असा प्रश्न उपस्थित केला की राहुल गांधींना चुकीची माहिती देण्यात आली आहे आणि ते राहुल गांधींचं मत आहे. जर माझ्या विधानावर कुणाला आक्षेप असेल तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. पण माफी मागणार नाही.


'मी माफी का मागावी? माझा हेतू कोणाला अपमानित करण्याचा नाही. जर एखाद्याचा अपमान झाला तर तर मी खेद व्यक्त करतो.'


माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रविवारी ग्वाल्हेर जिल्ह्याच्या डबरा दौर्‍यावर असताना एका सभेत इमरती देवी यांच्याविषयी चुकीची भाषा वापरली.