मध्य प्रदेश : कॉंग्रेस नेता कमलनाथ हे थोड्याच वेळात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील महत्त्वाच्या व्यक्ती याठिकाणी दाखल झाल्या आहेत. काही वेळापुर्वीच कॉंग्रेस अध्यक्ष मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात पोहोचले आहेत. थोड्या वेळात कमलनाथ यांच्या शपथविधीला सुरूवात होणार आहे.  कमलनाथ हे मध्य प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल त्यांना मुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सोहळ्याच्या आधी सर्वधर्म प्रार्थना होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधी सोहळे पार पडत आहेत. सकाळी 10 वाजता राज्यस्थानमध्ये अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री तर  उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


छत्तीसगड शपथविधी 


आता दिड वाजता कमलनाथ हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर संध्याकाळी छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. छत्तीसगडमध्ये संध्याकाळी भूपेश बघेल हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा सुरू होणार असून त्यांच्यासोबत इतर कोणतेही मंत्री शपथ घेणार नसल्याचे कॉंग्रेस नेता मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले.