नवी दिल्ली : कांची कामकोटी पीठाचे प्रमुख शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरममध्ये निधन झालं आहे. 


82 वर्षाचे जयेंद्र सरस्वती यांच्या प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मठाच्या एका अकाऊंटंटने  शंकररामन हत्या प्रकरणात त्यांचं नाव घेतल्याने शंकराचार्य हे वादात सापडले होते.