Kangana Ranaut on Paris Olympics : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत 'ऑलिम्पिक 2024' च्या  उद्धाटन सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये पोहोचली होती. ऑलिम्पिक स्पर्धेला 10 हजारांहून अधिक खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले होते. ऑलिम्पिक उद्धाटन सोहळा हा भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 'द लास्ट सपर'चे सादरीकरण करण्यात आले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सोहळ्याला आलेल्या अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच खासदार कंगना रणौतने देखील पॅरिस ऑलिम्पिकवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौतची प्रतिक्रिया 


ऑलिम्पिक 2024 च्या उद्धाटन समारंभाच्या 'द लास्ट सपर'च्या सादरीकरणावरून कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिकच्या समारंभात लिओनार्डो दा विंची यांच्या 'द लास्ट सपर'चे सादरीकरण करण्यात आले होते. ज्यात ख्रिस्तांची जागा एका महिलेने घेतली  होती. तर लहान मुलासह ड्रॅग क्वीन, ट्रान्स फिगर देखील दाखवण्यात आले होते. यामुळे ऑलिम्पिक समारंभाला आलेल्या दिग्गजांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ख्रिश्चन धर्माचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. 


इन्स्टाग्रामवर कंगनाकडून फोटो शेअर


कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की, पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या समारंभात सादर केलेल्या 'द लास्ट सपर' निंदनीय आहे. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तो ड्रॅग क्वीनसोबत परफॉर्मन्स करतो आहे. तर निळ्या रंगामध्ये रंगवलेला एक नग्न माणूस येशू ख्रिस्त म्हणून दाखवला आहे. यामुळे ख्रिश्चन धर्माचा अपमान झाल्याचं कंगना रणौतने म्हटलं आहे. 



'मी समलैंगिकतेच्या विरोधात नाही'


पॅरिसमधील ऑलिम्पिक उद्धाटनामध्ये समलैंगिकतेवर सर्वकाही आधारित होते. मात्र, मी समलैंगिकतेच्या विरोधात नाही. परंतु ऑलिम्पिक लैंगिकतेशी कसे संबंधित आहे. हे सर्व माझ्यासाठी आकलनापलीकडेचे आहे. या उद्धाटनामध्ये अनेक देशांमधील स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्व देशांना सेक्स हा मानवाचा सर्वोत्तम आविष्कार असे का वाटते? सेक्स फक्त बेडरुमपुरताच मर्यादित का राहू शकत नाही? या सर्व गोष्टीला राष्ट्रीय ओळख का असावी? हे सर्वच फार विचित्र आहे. असं कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोंवर म्हटलं आहे.