कंगना राजकरणात प्रवेश करण्यासाठी सज्ज...माध्यमांसमोर केला खूलासा
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिला गेल्या काही वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देखील ओळखली जाते.
Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिला गेल्या काही वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देखील ओळखली जाते. तिनं प्रत्येक वेळेस स्वत:ची मते मांडली आहेत. अनेकदा या मतांमुळे ती अडचणीत ही आली आहे. अभिनेत्रीने प्रत्येक वेळी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय विषयांपासून ते सामाजिक आणि देशाच्या समस्यांवर ती उघडपणे आपली मते मांडते.
बॉलिवूडच्या या बिनधास्त अभिनेत्रीने आता राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने आपल्या गावी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (kangana ranaut is all set to enter politics revealed to the media nz)
हे ही वाचा - Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच
कंगना राजकरणात
कंगना रणौतने 'आज तक' या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. हिमाचल प्रदेशात पंचायत निवडणुका होणार आहेत. कंगना राणौतही या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आली होती. हिमाचल हे कंगनाचे मूळ गाव आहे. राज्यात निवडणुका होणार आहेत आणि त्याच दरम्यान कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आपल्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगनाने सांगितले की, जनतेची इच्छा असेल आणि भारतीय जनता पक्ष तिला तिकीट देईल तर ती निवडणूक लढवण्यास तयार आहे.
हे ही वाचा - श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या
कंगना म्हणाली- मी राजकीय कुटुंबातून आले आहे. माझे वडीलही राजकारणात होते. आमची जी काही व्यवस्था आहे ती माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली. पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यावर अचानक परिवर्तन झाले. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा पंतप्रधानांबद्दल सांगितले आणि 2014 मध्ये आम्ही अधिकृत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो.
हे ही वाचा - Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS
राजकारणात प्रवेश करण्याच्या योजनेवर कंगना राणौत म्हणाली, "परिस्थितीनुसार भाजप सरकारला माझा सहभाग हवा असेल तर मी सर्व प्रकारच्या सहभागासाठी तयार आहे." हिमाचल प्रदेशच्या जनतेने मला सेवेची संधी दिली तर चांगले होईल. त्यामुळे निश्चितच ही नशिबाची बाब असेल.'