Kangana Ranaut Slap Incident : नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतला  (Kangana Ranaut) 6 जूनला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने (Kulwinder Kaur) कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांना निलंबित केलं होतं. पण ती आणि तिचे पती सेवेत रूजू झाली असून बदलीच्या बातम्या समोर येत आहे. कुलविंदर कौरची बंगळुरुला बदली करण्यात आली असं म्हटलं जातं. पण या बातमीमध्ये किती तथ्य आहे याबद्दल सीआयएसएफने (CISF) खुलासा केलाय. (Kangana Ranaut Slap CISF constable transferred to Bangalore CISF told the truth)


CISF कॉन्स्बेटलला पुन्हा सेवेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीआयएसएफने आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय की CISF कॉन्स्बेटलला पुन्हा सेवेत घेतलेल नाही. सीआयएसएफने म्हटलंय की, कुलविंदर कौरला पुन्हा कामावर घेतलं गेलं नाही किंवा तिची बदलीही झालेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कुलविंदर कौरला अद्याप निलंबित करण्यात आलंय, तिच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असल्याचही यात म्हटलंय. 


बदलीचे सर्व दावे...


कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला पुन्हा नोकरीवर बोलावण्यात आल्याच्या आणि तिची चंदीगडहून बेंगळुरूला बदली झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याच म्हटलं गेलंय. अशात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिचा भावाचं वक्तव्यही समोर आलंय. तो म्हणतो की, 'कंगना राणौतची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कंगना राणौतने आजपर्यंत तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही, तर माझी बहीणही माफी मागणार नाही.' कुलविंदर कौरचा भाऊ शेरसिंग महिवाल म्हणतो की, 'माझ्या बहिणीला कंगना राणौतला थप्पड मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही.' 


दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या कमेंटमुळे कंगना संतापली होती. या कारणावरून तिने तिला कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कंगनाने खुद्द एक व्हिडीओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याच म्हटलं होतं.