Farmers Protest : टीम इंडियाच्या खेळाडूंवर Kangana Ranaut चं वादग्रस्त टीम
शेतकरी आंदोलनाचे जगभर पडसाद
मुंबई : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest)इंटरनॅशनल पॉप स्टार रिआना (Rihanna) ने ट्विट केल्यामुळे या मुद्याला वेगळचं वळण आलं. आता रिआनावर इंटरनॅशनल प्रोपगंडा चालवण्याचा आरोप केला आहे. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्विट करून आपली मतं नोंदवून, देशाने एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला आहे.
आता क्रिकेटर्सने केलेल्या ट्विटवर चर्चा होत आहे. या सगळ्या खेळाडूंच्या ट्विटवर कंगना राणौत (Kangana Ranaut) ने वादग्रस्त ट्विट करून उत्तर दिलं आहे.
कंगना रानौतचं आक्षेपार्ह ट्विट
शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) आता सर्व खेळाडू आपली बाजू ठेवत आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे सारख्या मोठ मोठ्या खेळाडूंनी देशाला एक संदेश दिला आहे. रोहित शर्माने देखील यावर ट्विट केलं आहे. ज्यानंतर कंगना रानौतने या ट्विटला रिट्विट करत किकेटर्सवर निशाना साधला आहे.
कंगना रानौतने म्हटलंय की,'सगळे क्रिकेटर्स धोबीचे कुत्रे.... न घर का ना घाट का सारखं का वागत आहेत? शेतकरी कायद्याच्या विरोधात का असतील? जो कायदा त्यांच्या चांगल्यासाठीच असेल. हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घालत आहेत. सांगा ना एवढं का भीती वाटते?'
शेतकरी आंदोलनाबाबत ट्विटरवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या हॉलिवूड स्टार रिहानाला सचिन तेंडुलकरनं फटकारलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पॉप स्टार रिहानासह अनेकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताच्या खासगी प्रश्नावर अनेकांनी दखल देण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी सोशल मीडियावर ट्विट करत सचिन तेंडुलकरने साऱ्यांच तोंड बंद केलं आहे.