व्हिडिओ,बंद खोलीत सापडल्या ८० कोटींच्या जुन्या नोटा
छापेमारीच्या कारवाईत ८० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा एजंसी (एनआयए) आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई पूर्णत्वास नेली आहे. त्यांनी केलेल्या छापेमारीच्या कारवाईत ८० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत.
एका बंद खोलीत जून्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना कळली होती.या नोटा बदलवून देण्याचे सांगणाऱ्या अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
भारतीय रिजर्व बॅंकेचे अधिकारी आणि आयकर विभाग या रक्कमेबद्दलची नेमकी माहिती देतील असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या व्यक्तींची नावे पोलिसांनी सांगितली नाहीत.
तपास सुरू
बंद खोली जुन्या नोटा असल्याची बातमी आम्हाला मिळाली,त्यानंतर पोलिसांनी छापा टाकल्याचे कानपुर एसएसपी ए.के.मीना यांनी सांगितले. अजून नेमकी किंमत कळाली नाही, पोलिसांचा तपास सुरू असल्याचे आरबीआय आणि आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारी अधिकाऱ्यांचा हात
याप्रकरणात सरकारी अधिकारी गुंतल्याच्या संशयावरून पुढील तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काहीजण ताब्यात
ही कारवाई कानुपमधील सीसामऊ येथे करण्यात आली. स्वरुन नगर पकेटच्या एका हॉटेलमधून काहीजणांना ताब्यात घेतल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस महानिरीक्षक आलोक सिंह या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.