Crime News In Marathi: इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाच्या काकाने त्याच्या आईची मस्करी केली. काकाची मस्करी त्याला चांगलीच खटकली. नाराज झालेल्या मुलगा सतत रडत होता. त्याच्या आईसह आत्यावर काकीनेही त्याची समजूत घातली मात्र, तो ऐकायलाच तयार नाही. आईसोबत मस्करी केल्याची घटना त्याच्या मनातून जातच नव्हती. त्यातूनच त्याने धक्कादायक पाऊल उचलले आहे. मुलाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील संचेडी परिसरातील भौतीजवळील प्रतापपुर परिसरातील आहे. राधेश्याम याला तीन मुलं आहेत. त्याचा मधला मुलगा इयत्ता पाचवीत शिकतो. जवळपास 11 वर्षांचा असून तो त्याच्या आईच्या खूप जवळ होता. त्याच्या आईला कोणीही वाईट बोललेले त्याला कधीच सहन होत नव्हते. 


शुक्रवारी मुलाची आई परिसरातील इतर महिलांसोबत बोलत बसल्या होत्या. त्याचवेळी परिसरात राहणाऱ्या एका युवकाने मुलाच्या आईची मस्करी केली. ही गोष्ट मुलाला इतकी खटकली की त्याने आईसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली. तुझी मस्करी का करत आहे, असं म्हणत आईसोबत वाद घातला. यावर त्याच्या आईने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो शांत होण्यास तयारच नव्हता. इतकंच नव्हे तर, त्याला त्याच्या आत्याने आणि इतर लोकांनीही समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील तो ऐकण्यास तयार नव्हता. 


या घटनेनंतर तो घरी निघून गेला. मात्र, तरीही तो रडतच होता. त्याच्या आईने त्याला खूप समजवल्यानंतर तो शांत झाला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला बाजारात सोबत येण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार देत इथेच खेळतो असं सांगत आईला बाजारात जायला सांगितले. आई घरातून बाहेर जाताच त्याने दार बंद करुन घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याचवेळी मुलाच्या आत्याने खिडकीतून त्याचा मृतदेह लटकताना पाहताच आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला. घरातील सर्वच धावत पोहोचले व दरवाजा तोडत आत शिरले. पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. 


पोलीस काय म्हणाले?


या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी मुलाच्या आत्महत्येचे कारण विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की, एका तरुणाने मुलाच्या आईसोबत मस्करी केली. त्याचवेळी घरातील सर्व महिलाही बसल्या होत्या. मुलाला ती गोष्ट खटकली त्याने आईला विचारलंदेखील की त्याने अशी मस्करी का केली. त्यावर आईने त्याला समजावलेदेखील आणि ती बाजारात गेली. मात्र, ती बाहेर पडताच मुलाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं आहे.