Rajasthan Karauli Ldy Don Rekha Meena : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. पण अनेक ठिकाणी सोशल मीडियाचा वापर अनेक वाईट कामांसाठी देखील केला जातो. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये चर्चेत आलेली रेखा मीणा (don rekha meena) पुन्हा चर्चेत आली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात रेखा मीणा जयपूरमध्ये फरार होती. रेखा फरार असल्याची माहिती मिळताच जयपूरच्या रामनगरिया पोलिसांनी तिला पकडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नुकताच करोली येथे रेखा आणि तिच्या साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित योगेश जादौनने केलेल्या आरोपांनुसार, 29 नोव्हेंबर रोजी तो शाळेतून घरी परतत होता. याच दिवशी दुपारी अंजनी माता मंदिराजळ दोन तरुणी आणि चार तरुण मद्यपान करत होते. 



तेव्हा योगेशने त्यांनी मद्यपान करु नका असं सांगताच, रेखासोबत असलेल्या पाच जणांनी योगेशवर गोळीबार केला. याच प्रकरणी रेखा फरार होती. रेखा मीना (20) या करौली जिल्ह्यातील तोडाभीम येथील नागल लाट गावातील रहिवासी आहेत. त्याच्या आईचे निधन झालं असून वडील कमल मीना मजुरीचे काम करतात. (karauli lady don rekha meena arrested in jaipur)


रेखा कशी करौलीची 'लेडी डॉन'


याआधी रेखा 2020 साली चर्चेत आली होती. जानेवारी 2020 मध्ये, रेखा मीनाने हिस्ट्रीशीटर पप्पुलाल मीना यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. (who is lady don rekha meena)



रेखाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह करत हिस्ट्रीशीटरला उघडपणे धमकीआणि शिवीगाळ केली होती. धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेखा मीनाला पोलिसांनी अटक केली. त्या दिवसापासून रेखा करौलीची डॉन म्हणून ओळखली जाऊ लागली.