श्रीनगर : देशभरात थंडीची लाट सुरू झाली आहे. देशातील काही भागांसह काश्मीरमध्ये जोरदार थंडी पडतेय, लद्दाखच्या कारगिल शहरात, काल रात्री सर्वात जास्त थंडी होती. हे तापमान काल रात्री शून्यापेक्षाही खाली गेलं होतं.


सर्वात कमी तापमानाची रात्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येथील किमान तापमान शून्यापेक्षा खाली ११.२ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. हे गुरूवारी रात्रीपेक्षाही १ डिग्री कमी होतं. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची ही रात्र होती.


लेहमध्ये पारा -9.6 डिग्री सेल्सियस


एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लेहमध्ये पारा -9.6 डिग्री सेल्सियस नोंदवला गेला, जो गुरूवार रात्रीपेक्षा ४ डिग्री सेल्सियस आणखी कमी होता.


जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगरमध्ये शून्यापेक्षा १.१ डिग्री सेल्सियस खाली तापमान होतं. हे तापमान गुरूवारी रात्रीपेक्षा १ डिग्री सेल्सियसने कमी होतं.


दहा वर्षातील रेकॉर्ड ब्रेक थंडी


उत्तर काश्मीरमध्ये रिसॉर्टसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्ग शहरात गुरूवारी रात्री, दशकातील सर्वात जास्त थंडी नोंदवली गेली. येथील तापमान ८.४ डिग्री सेल्सियसपेक्षा खाली गेलं होतं.


काश्मीर खोऱ्यातील रात्र आतापर्यंतची सर्वात थंड रात्र होती. पहेलगाममध्ये तापमान शून्याच्या ३.५ डिग्री सेल्सियसच्या खाली नोंदवलं गेलं.